Posts

Showing posts from February, 2022

महाशिवरात्री विशेष

Image
             आज महाशिवरात्र म्हणजेच "महान शिवाची रात्र", शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र व्रत. पुराणकथानुसार ज्यावेळी समुद्रमंथन झाले त्यात सृष्टीशी निगडीत सर्व महत्वपुर्ण गोष्टींची निर्मीती झाली परंतु त्याचवेळी समुद्रमंथनातुन हलाहल विष देखील बाहेर आले. या विषात ब्रम्हांडाला नष्ट करण्याची ताकद होती. आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवांमधेच होती त्यामुळे त्यांनी हे हलाहल विष प्राशन करून ब्रम्हांडाला वाचवले. पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व संपुर्ण देहाचा दाह होत होता. वैद्यांनी भगवान शिवांना संपुर्ण रात्र जागुन काढण्याचा उपाय सांगितला. सर्व देवांनी भगवान शिवांना बरे वाटावे म्हणुन रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली. सकाळी महादेवांनी सर्वांना आशिर्वाद दिला. या संपुर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली म्हणुन या दिवसाला महाशिवरात्री असे म्हंटले जाते. ह्याच महाशिवरात्रीचे औचित्य साधून माहिती साठी शिवाच्या वेगळवेगळ्या रूपातील काही फोटो प्रसिद्ध करीत आहे हर हर महादेव. केवल शिव स्थानक शिव नृत्यमग्न शिव नटराज कटिसममुद्र...